Showing posts with label Love Story Of Young Boy. Show all posts
Showing posts with label Love Story Of Young Boy. Show all posts

Tuesday, 22 November 2011

Real Story - Love Story Of Young Boy


एक खरी आणि खुरी प्रेम कथा….एका युवकाची…..तर ते अस घडल…


एका युवकाची आणि एक मुलीची ओळख झाली आपल्या ओर्कुट माध्यमातून,,,,रोजच online बोलन सुरु झाल…ते एवढे चांगले मित्र झाले कि एकमेकांशी गप्पा मारल्या शीवाय ते रहात नसत…. या काळात अनेक वेळा भांडण आणि पुन्हा मैत्री असे घडू लागले…किमान ३ ते ४ महिने हे असेच चालू होते…परंतु त्या युवकाने तिला कधीच प्रेमाविषयी सांगितले नाही….


आणि एकदिवस चक्क त्या मुलीने त्...............याला विचारले. तू माझ्यावर प्रेम करतोस? दोघांनी एकमेकांना समोरासमोर कधीच पाहिले नव्हते. फक्त फोटो पाहिले होते….तिच्या त्या प्रश्नावर त्या युवकाने उत्तर दिले. हो. करतो मी प्रेम तुझ्यावर म त्या युवतीने त्याला विचारले याआधी तू का नाही बोललास ? युवक म्हटला मला माहित नव्हत तू माझ्यावर प्रेम करतेस का ते? पण मी तुझ्यावर प्रेम करतो असे सांगितले आणि तू मैत्रीही नाही ठेवली तर? अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी होकार मिळाला आणि रोजचा गुड मोर्निंग हा शब्द आय. लव. यु कडे वळला…..हळू हळू फोन वर बोलन चालू झाल. आणि ओर्कुट वरील मैत्री एवढ्या छान प्रेमात बदलली कि एकही दिवस किंवा एकही क्षण दोघांशिवाय न रहाण्याच्या शपथा हे दोघे घेऊ लागले…


वेळ आली ती भेटण्याची दोघांनाही आतुरता होतीच खरी….पण तीच त्याला नेहमीच आमंत्रण असायचं…हा मात्र कामामुळे जाऊ शकत नव्हता….या प्रेमाची बातमी चक्क मुलीच्या आईला समजली पण कोणी एवढ मनावर नाही घेतलं….त्या मुलानेही ठरविले कि आपण भेटायला जायचे….पुण्यातून तो मुंबईकडे निघाला दोघांनाही एकीकडे प्रेमाचे अश्रू आणि पहिल्या भेटीची भीती वाटू लागली…..भेटीचे ठिकाण ठरले वी. टी स्टेशन चे ते मोठे घड्याळ त्याच्या खाली.. युवक तेथे पोहोचला त्याच्या आधी ती तेथे येऊन थांबली होती….दोघांनी एकमेकाना पाहिलं आणि एकमेकांना कडकडून मिठीत घेतलं…कदाचित अस होईल हे दोघांना माहित नव्हत पण हे नक्की समजल…त्याच तिच्यावर आणि तीच त्याच्यावर खरच खर प्रेम होत… कुठे फिरायला जायचं हा प्रश्नाला भायखल्याची महालक्ष्मी असे उत्तर मिळाले…आणि दोघे तेथून महालक्ष्मी च दर्शन घेण्यास गेले….काय बोलायचं आणि काही नाही हे प्रश्न चिन्ह दोघांच्याही चेहर्यावर होत….फोन वर आय. लव. यु ऐकू येणारे शब्द समोरासमोर आल्यावर लवकर कोणी बोलेना….शेवटी युवकाने धाडस केले आणि बोलला…..महालक्ष्मी च्या दर्शनानंतर हाजीमलंग झाल आणि गप्पा सुरु झाल्या….किमान ४ तास… ती युवती एका खासगी कंपनी मध्ये काम करीत होती आणि ऑफिस वरून यायला वेळ होईल असे सांगून युवकासोबत फिरत होती….शेवटी निरोप घेण्याची वेळ आली आणि…पुन्हा वी. टी station वरून दिवसभराच्या भेटीची सांगता झाली…..


दोघांनीही तो दिवस आयुष्याच्या पानावर लिहून ठेवला. कधीच न पुसण्यासाठी….अशी हि पहिली भेट झाल्यानंतर एक मेकांशी पुन्हा फोन वर बोलन चालू झाल… एवढ झाल कि एकमेकांनी लवकरच पळून जायचं आणि लग्न करायचं अस ठरवलं… किमान पुन्हा ४ महिने हे प्रेम प्रकरण चालू राहील आणि हा युवक तिच्याशीच नव्हे तर तिच्या घरातील सर्वांशी बोलू लागला…..फक्त तिचे बाबा सोडून….दररोज तासान तास बोलन चालू असायचं….या दोघात कधीच कसलंही भांडण नाही झाल…..ऑगस्ट मध्ये त्यांनी engagement करायची अस ठरवलं….नोव्हेंबर २००९ या महिन्यात…..ते एकमेकांच्या बंधनात अडकणार होते.. एक दिवस ते काहीतरी कारणास्तव बोलू शकले नाहीत….


दोघांनाही फार आठवण आली होती…सकाळी सकाळी या युवकाने तिला फोन केला पण तो बंद होता आणि अकराच्या सुमारास तिच्या बहिणीचा फोन आला….कि ती काल रात्री ट्रेन मधून पडली आणि हे जग सोडून गेली……युवकाला काय करावे सुचेना उठून त्याने मुंबई गाठली आणि तिची अखेरची भेट ती सरणावर असताना घेतली…..
सारी स्वप्न त्या चितेत पेट घेत होती.. या नंतर किमान ७ दिवस या युवकाने कोणाला काहीच प्रतिक्रिया दिली नाही आणि त्यानंतर तो ठीक झाला परंतु कदाचित अजून देखील एक फोन येईल अस वाटत असेल….. तो तिला विसरू शकेल ? अशी हि आपल्यातीलच एका युवकाची….. अधुरी एक कहाणी…