Sunday 27 November 2011

Marathi Song भातुकलीच्या खेळामधली Singer अरुण दाते

Marathi Song भातुकलीच्या खेळामधली  Singer  अरुण दाते


भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी
अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी ॥धृ॥

राजा वदला , ``मला समजली शब्दांवाचुन भाषा 
माझ्या नशिबासवे बोलती, तुझ्या हातच्या रेषा ''
कां राणीच्या डोळा तेव्हा, दाटुनी आले पाणी ? ॥१॥

राणी वदली बघत एकटक दूर दुरचा तारा 
``उद्या पहाटे दुसऱ्या वाटा, दुज्या गांवचा वारा ""
पण राजाला उशिरा कळली गूढ अटळ ही वाणी ॥२॥

तिला विचारी राजा, `` कां हे जीव असे जोडावे ?
कां दैवाने फुलण्याआधी फूल असे तोडावे ?''
या प्रश्नाला उत्तर नव्हते, राणी केवलवाणी ॥३॥

कां राणीने मिटले डोळे दूर दुर जाताना ?
कां राजाचा श्वास कोंदला गीत तिचे गाताना ?
वाऱ्यावरती विरुन गेली एक उदास विराणी ॥४॥

No comments:

Post a Comment

Blog Archive