मोबाईलमुळे कर्करोगाचा धोका नाही!
दूरसंपर्काचे प्रभावी आणि अल्पावधीत लोकप्रिय झालेले माध्यम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोबाइल फोनच्या वापरामुळे कॅन्सरा धोका असतो, हा मतप्रवाह शास्त्रज्ञांच्या एका समूहाने खोडून काढला आहे.
मोबाइल फोन मानवाच्या शरिरास घातक नाही, असा दावा “बि÷टिश मेडिकल जर्नल’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखात करण्यास आला आहे. मोबाइलच्या अतिवापराने मेंदूचा कर्करोग होतो का याबाबत संशोधकांनी केलेल्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या संशोधनात मोबाईल व मेंदूचा कर्करोग यांमध्ये काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे. कोपनहेगन येथे कर्करोगपरिस्थितीविज्ञान संस्थेच्या संशोधकांनी तीन लाख 58 हजार लोकांचे 18 वर्षे परिक्षण केले.
यामध्ये त्यांना मोबाईल वापरणाऱ्या लोकांना होणाऱ्या कर्करोगाचे प्रमाण व मोबाईल न वापरणाऱ्यांना होणाऱ्या कर्करोगाचे प्रमाण सारखेच असल्याचे आढळून आले आहे. यावरुन मेंदूच्या किंवा अन्य कोणत्याही कर्करोगासाठी मोबाईल कारणीभूत नसल्याचा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे.
No comments:
Post a Comment