Saturday, 5 November 2011

मित्रा, सुप्रभात .....दुसऱ्याशी स्पर्धा करताना

मित्रा, सुप्रभात .....दुसऱ्याशी स्पर्धा करताना यश मिळाले तरी ते टिकेल याचा भरवसा नाही....कारण पुढच्या स्पर्धेत आपल्याहून वरचढ स्पर्धक आला तर ? हा नकारात्मक विचार नाही.....कारण कोणी न कोणी तरी कशात न कशात तरी सरस असतोच ना ! तो कोण हे ठाऊक नसते इतकेच .....मग करावे तरी काय ? स्पर्धा करा पण ती स्वतः शी .....स्पर्धा ही माणसांशी नाही तर ती आपल्यातल्या प्रगतीसोबत झाली पाहिजे .....आपली कर्तबगारी हाच आपला मानबिंदू .....आपला अनुभव हाच आपला गुरु ....आपली महत्वाकांक्षा हीच आपली स्फूर्ती !! मित्रा , आपल्या क्षमतांवर ताण देऊन आपणच त्या वाढवायच्या ....आपल्या कौशल्यांना उत्कृष्टतेचा साज चढवायचा आणि आपल्याच बुद्धीचातुर्याला नवनवी आव्हाने द्यायची !!!!!!!मित्रा, आता गंमत अशी आहे,की आपल्याशीच लावलेल्या स्पर्धेत आपण हरलो, तरी आपणच जिंकतो !!!! खरे की नाही?

No comments:

Post a Comment

Blog Archive