हजारो अमेरिकी नागरिकांनी शनिवारी कॉर्पोरेट व खासगी बॅंकांतील आपली खाती बंद केली. त्यानंतर या खातेदारांनी नफा न कमावणाऱ्या संस्थांमध्ये आपली खाती उघडली. आपल्याकडे असे करायला लोक धजावतील का ? परदेशात काय दिसते ? युरोपीय समुदाय, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि युरोपियन सेंट्रल बॅंक आज कठोर का झाल्यात? आर्थिक मदतीचा प्रत्येक हप्ता देताना ग्रीसवर आर्थिक फेररचनेच्या अटी का घातल्या गेल्या? आर्थिक बेशिस्तीला सरावलेली नोकरशाही, प्रचंड असा संघटित नोकरवर्ग आणि सामान्य नागरिकही आर्थिक पुनर्रचनेच्या अटींना विरोध करीत आहेत. आणि आपल्याकडे काय चालू आहे? अण्णा एके अण्णा ...!!!
गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या राजकीय नेतृत्वाने जी सवंग धोरणे स्वीकारली, त्यातून आपल्यासमोर पेच उभा राहिला. महागाई वाढली ...त्यातच जोडीला भ्रष्टाचार आणि औद्योगिक विकासाची मंदावलेली वाटचाल या गोष्टींची भर पडली. लोकानुनयी आर्थिक धोरणे आखून लोकप्रियतेचा आलेख उंचावतो येतो; पण त्याचा अतिरेक अर्थव्यवस्थेची हानी करतो..हेच खरे ...
No comments:
Post a Comment