"हजारो मैलावर एक माणूस सुद्धा नसलेल्या एका ओसाड जागी तो कित्येक दिवसांपासून उभा असतो, तेवड्यात तिथे कोणीतरी येत (विशाल) असल्याची त्याला चाहूल लागते .....
तो :- आज ह्या आड वळणा वरची वाट कोण चुकल ?
विशाल :- माफ करा मी तुम्हाला disturb तर नाही केलेना ? जरा आलो होतो फिरत फिरत .....
तो :- फिरत फिरत ? ते सुद्धा इकडे ?
विशाल :- हो मी शोधात आहे ..
तो :- कोणाच्या ?
विशाल :- प्रेमाच्या !!
तो :- हा हा हा ... प्रेमाच्या ? ते सुद्धा इकडे ???
विशाल :- हो ..... बाग बगीचे, माणसांची गावे, मित्रांचे देश, भावनांचे वेश .... सार सार काही फिरलो, पण कुठेच नाही मिळाल, !!! असो ............ पण तुम्ही इकडे कसे काय ?
तो :- मी आता इथेच असतो !!
विशाल :- इथेच म्हणजे ??? तुम्ही इथे राहतां ?? अशा जागी ?
तो :- हो !! ..........पण पूर्वी असायचो मी बाग बगीच्यात, मित्रांच्या देशात, भावनांच्या वेशात !!!! ...... नंतर तिथे मला फक्त व्यवहार दिसू लागले ......... जागाच नव्हती मला त्या मुखवत्यांच्या देशात !!
विशाल :- एक एक एक मिनिट .......... तुम्ही कोण ? तुमचे नाव काय ?
.
.
.
तो :- प्रेम !!!!!!!!!!!!"
No comments:
Post a Comment