पेट्रोल महागले
आयातीत कच्च्या तेलाचे भाव वधारल्याने सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोलच्या किमतीमध्ये प्रतिलीटर १ रुपया ८0 पैसे वाढ केली. हा वाढीव दर मध्यरात्रीपासून लागू झाला आहे.
आजच्या वाढीसोबतच राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलीटर ६८ रुपये ६४ पैसे झाला आहे. देशातील विविध शहरांमध्ये स्थानिक करांसह ही दरवाढ वेगवेगळी राहील. दोन महिन्यांपेक्षा कमी काळात दुसर्यांदा पेट्रोलच्या भावात वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या आठवड्यात अन्नधान्य महागाईने नऊ महिण्यांचा उच्चांक गाठला. १६ सप्टेंबरला सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांनी पेट्रोलचे दर प्रतिलीटर ३ रुपये १४ पैशांनी वाढविले होते. तेव्हा एका डॉलरचा भाव ४८ रुपये होता. आज तो ४९.१५ रुपये आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये सरकारने पेट्रोलची किंमत नियंत्रणमुक्त केली होती.
रुपयाची लीटरला वाढ!
मुंबई...
सध्याचा दर ७१.९२
दरवाढ १.८0
आजचा दर ७३.७२
ठाणे...
नवे दर
पॉवर ७७.५७
साधे ७६.५0
No comments:
Post a Comment