Thursday, 27 October 2011

This is fact of life Friend - नात्ती तोडायची नसतात


This is fact of life Friend

मित्रा, आजकाल स्वप्नांमध्ये पण भाव नसतात कारण स्वप्नांचेच भाव वाढले आहेत...माझ्या मनात तुझ्याबद्दल अविश्वास नाही, राग, तिरस्कार अजिबात नाही, पण एकमेकांवर अवलंबून राहिलं की आधारापेक्षा लटकालटकी आणि प्रगतीपेक्षा ‘तीनपायांची’ शर्यत असा खेळ सुरु होतो असे मला वाटते ....आपल्याभोवती अंधार दाटावा अशी अनेक ढग तयार होत असतात. जातीची, धर्माची, भाषेची, मूलतत्त्ववादाची, विचारांची , वेगवेगळ्या कलहांची, कुपोषणाची आणि काही वेळा माणसाचा चेहरा नाकारणारी ढग होतात सुद्धा तयार होतात ..... त्यांना कधी काटे तर कधी भालेही फुटतात. कधी-कधी ते उजेडावरच चाल करून येतात.... जखमी करतात उजेडाला..... हे सारं आपण टाळू शकतो; पण जेव्हा उजेडपक्ष्यांच्या जन्माचा आणि त्याच्या स्वप्नपर्वाचा आशय नीट समजावून घेतो तेव्हा... ‘माणूस एकटाच येतो आणि एकटाच जातो!’ असं तत्त्वज्ञानातील वाक्य माणसं सहजपणे उच्चारून मोकळे होतात..... प्रत्येक अनुभव, प्रत्येक कृती, प्रत्येक विचार करताना आपण एकटेच असतो. एकटं असणं हे स्वाभाविक, नैसर्गिक आहे. नातं, जोडलेपण यात प्रयत्न आहे. हे नातं, जोडलेपण स्वाभाविकरित्या जेव्हा स्वतःला स्वतःशी अनुभवायला जमायला लागतं तेव्हाची मजा वेगळी असते. स्वतःशी स्वस्थ, शांत, निवांत राहता यायला, जमायला हवं! आणखी घुसमट व्हायला लागते... म्हणूनच उजेड आतही हवा आणि उजेड बाहेरही हवा...स्वतःवर, भोवतालावर नव्यानं प्रेम करायला शिकलं म्हणजे रसपूर्ण जगण्याची वाट सापडते. एकटेपणाच्या कोशातून बाहेर पडून एक अर्थपूर्ण "समूहसंदर्भ' आपल्या अस्तित्वाला संवाद आणि नात्यांमुळेच मिळतो...मित्रा, म्हणून नात्ती तोडायची नसतात...पण जिथे संवादच नसतो अशी बिनकामाची नाती पण नको असतात ....अर्थपूर्ण नात्याचा पूल उभा करता येतो, त्या पुलावरून माणसं अलीकडे नाही आली तरी लष्कराच्या तात्पुरत्या पुलासारखा तो सहजपणे लोकांशी जोडण्याचा असतो.....This is fact of life! भीषण आहे ना रे हे सारे ?
-MOna

No comments:

Post a Comment

Blog Archive